
दैनिक स्थैर्य | दि. १ जून २०२३ | फलटण |
महिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा ग्रामपंचायतस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार सासकल ग्रामपंचायतीतर्फे सौ.दिपाली किसन पवार व सौ. स्मिता मोहन दळवी यांना प्रदान करण्यात आला. सामाजिक, शैक्षणीक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.
याप्रसंगी सासकल गावचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हणमंत गंगाराम मुळीक, ग्रामपंचायत सदस्या चांगुणाबाई सर्जेराव मुळीक, लक्ष्मी रमेश आडके, सोनाली मंगेश मदने, पोलीस पाटील हणमंत सोनवलकर, ग्रामसेवक अशोक मिंड, किसन अण्णा पवार, संतोष सोनवलकर, नितीन कुंभार, सर्जेराव शंकर मुळीक, देविदास चांगण, पुष्पावती सुभाष मुळीक, सुधीर सोपन मुळीक, राजेंद्र सावंत, गौरव दिपक मुळीक, मनोहर संभाजी मुळीक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, व ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ. दिपाली किसन पवार, सौ. स्मिता मोहन दळवी यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.