बाहेर पडणे जीवावर बेतण्याचा प्रकार पोलिसांचा ससेमिरा चुकवण्याच्या नादात रुग्णालयात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. १८ : सातारा जिल्ह्यात पुन्हा झालेल्या लॉकडाऊनचा काल, शुक्रवारी पहिला दिवस. काल सायंकाळी साडे चारच्या सुमारास मंगळवार पेठेत कोल्हटकर आळीत दोन युवक रस्त्यावर फिरत होते. त्यांना पोलिसांच्या गाडीचा आवाज येताच दोघांनी धूम ठोकली. त्यातील एक जण त्रिशक्ती अपरामेण्टमध्ये घुसला. तोच युवक पळत पळत त्रिशक्ती इमारतीत घुसला. त्याला वाटले की पोलीस आपल्या मागे लागलेत अन त्याच गडबडीत टेरेसवरून पाय घसरून खाली पडला. यात हा युवक जखमी झाला असून त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.

सातारा शहरात लॉकडाऊनचे कडक दुसरे पर्व सुरू आहे. या लॉकडाऊनमध्ये काही युवक घराबाहेर पडत आहेत. असेच मंगळवार पेठेतल्या नाथाच्या पाराच्या येथील दोन युवक बाहेर पडले होते. शुक्रवारी सायंकाळी त्यांना कोल्हटकर आळीत आल्यानंतर पोलीस गाडीच्या सायरनचा आवाज आला. दोघांनी ही तेथून धूम ठोकली. त्यातला एक युवक त्रिशक्ती अपारमेण्टमध्ये शिरला. त्याला वाटले की पोलिस आपल्या मागेच आहेत त्यामुळे तो सुसाट चार ही मजले चढून टेरेसवर गेला. टेरेसवरून पाईपवरून खाली उतरत असताना पाय घसरून पडल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत.तो ज्या ठिकाणी पडला तेथे बराच वेळ तसाच कण्हत पडल्याचे काही स्थानिक नागरिकांनी पाहताच जखमी अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले.त्याच्या वडीलास कोणीतरी माहिती दिली. त्यास स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!