
दैनिक स्थैर्य | दि. २८ फेब्रुवारी २०२५ | विडणी | येथील लोकनियुक्त सरपंच यांनी त्यांच्या कार्यकाळात उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे विशेष समारंभात होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की; डॉ. विशाखा सोशल वेलफेअर, टीम झेनिथ राष्ट्रीय युवा पुरस्कारप्राप्त महासंघाच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रीय महिला संसदेचे आयोजन करण्यात आले आहे.