
दैनिक स्थैर्य | दि. 17 एप्रिल 2025 | फलटण | संपूर्ण राज्यामध्ये सन २०२५ ते २०३० या कालावधीमध्ये संपन्न होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या सरपंच पदाचे आरक्षण काढण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.
त्याबाबत नुकतेच परिपत्रक हे तहसीलदार यांना प्राप्त झाले असून येणाऱ्या आठवड्यात फलटण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत संपन्न होणार आहे.