
दैनिक स्थैर्य | दि. १० मार्च २०२५ | विडणी | येथे लोकनियुक्त सरपंच सागर (भैय्या) अभंग मित्र परिवार यांच्या वतीने सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे (PTPL) आयोजन करण्यात आले आहे. दि. १२ ते १६ मार्च रोजी ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस 1,21,000 रू.चे असून सरपंच सागर अभंग यांच्या वतीने देण्यात येणार आहे.
द्वितीय क्रमांक ७१,000 चे बक्षीस ग्रामपंचायत सदस्य सचिन अभंग यांच्यावतीने, तृतीय क्रमांकासाठी ४१,000 रू.चे बक्षीस ब्रह्मचैतन्य दूध संकलन केंद्राचे अमोल नाळे, तर जिजाई डेव्हलपर्सचे अनिल शेंडे यांच्या वतीने चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस 31,000 रु.चे देण्यात येणार आहे.
तसेच प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी अहमद शेख व अशोक नाळे यांच्या वतीने, मॅन ऑफ द सिरीज सायकल आत्मलिंग निंबाळकर यांच्या वतीने देण्यात येणार आहे.
तसेच बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर प्रत्येक चौकार, षटकार व विकेट साठीही बक्षिसांचे आयोजन करण्यात आले आहे .अशी माहिती लोकनियुक्त सरपंच सागर भैय्या अभंग मित्र परिवार व विडणी क्रिकेट क्लब यांच्या वतीने देण्यात आली आहे.