
दैनिक स्थैर्य | दि. 20 फेब्रुवारी 2025 | गोखळी | फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील सर्जेराव भिकोबा रोकडे (वय : ५८) यांचे अल्पशा आजारपणामुळे निधन झाले.
गोखळी येथे महाराष्ट्र बलुतेदार संघटनेच्या शाखा स्थापनेसाठी त्यांनी योगदान दिले. गोखळी ग्रामपंचायतीचे ते माजी सदस्य होते. नाना या टोपण नावाने ओळखले जात असत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, एक विवाहित मुलगी, दोन विवाहित भाऊ, भावजय सुना नातवंडे असा परिवार आहे.
राहत्या घरापासून निघालेल्या अंत्ययात्रेत अहमदनगर, बारामती, फलटण, दौंड, इंदापूर परिसरातून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेती, सहकार, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. गोखळी येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.