
दैनिक स्थैर्य । दि. ३१ ऑक्टोबर २०२२ । सातारा । सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांनी राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त राष्ट्रीय एकतेची व दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त भ्रष्टाचार निर्मुलनाविषयी उपस्थितांना शपथ दिली.