
स्थैर्य, वडले, दि. ४ सप्टेंबर : भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली, फलटण तालुक्यातील वडले येथे भाजप युवा मोर्चाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये वडले शाखेच्या अध्यक्षपदी श्री. संतोष शेडगे यांची, तर उपाध्यक्षपदी श्री. अमोल सोनवलकर यांची निवड करण्यात आली आहे.
वडले गावात नुकत्याच संपन्न झालेल्या भाजपच्या जनसंपर्क अभियानानंतर या निवडी जाहीर करण्यात आल्या. या अभियानासाठी भाजप राज्य परिषद सदस्य श्री. संतोष गावडे, जिल्हा सरचिटणीस श्री. जयकुमार शिंदे आणि माजी पूर्व मंडल अध्यक्ष श्री. बजरंग गावडे हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
नूतन कार्यकारिणी खालीलप्रमाणे:
- अध्यक्ष: श्री. संतोष शेडगे
- उपाध्यक्ष: श्री. अमोल सोनवलकर
- सरचिटणीस: श्री. बापूराव धायगुडे
- सचिव: श्री. किशोर लाळगे
या कार्यकारिणीमध्ये सदस्य म्हणून श्री. भिवाजी गेजगे, नेताजी काळे, राजेश सोनवलकर, सागर सोनवलकर, विशाल लाळगे, अमोल मोरे, रविंद्र सोनवलकर, आदेश लाळगे, संजय सोनवलकर, चंदू आडके, दशरथ नाळे, विठ्ठल रंभाजी शेडगे, अजित मोरे आदींचा समावेश करण्यात आला आहे.
या निवडीप्रसंगी भाजपचे युवानेते श्री. विजयकुमार सोनवलकर, श्री. किरण लाळगे, श्री. दादा खवळे, माजी सरपंच श्री. ज्ञानेश्वर लाळगे, माजी सरपंच श्री. निलेश लाळगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.