घडसोली मैदान येथील “सुरभी चहा”चे सर्वेसर्वा संतोष पोटफोडे यांचे निधन


दैनिक स्थैर्य | दि. 01 ऑगस्ट 2024 | फलटण | येथील घडसोली मैदान येथे असणाऱ्या “सुरभी चहा”चे सर्वेसर्वा, निंभोरे गावचे सुपुत्र संतोष गुलाबराव पोटफोडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.

फलटण येथील प्रसिद्ध सुरभी चहाचे ते मालक होत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी एक मुलगा एक मुलगी, दोन बंधू असा परिवार आहे.

वडिलांच्या दुःखद निधनानंतर निंभोरे येथून फलटणमध्ये आल्यावर कष्टातून सुरभी चहाच्या माध्यमातून त्यांनी संसार उभा केला होता.

त्यांच्या निधनाने संपूर्ण फलटण शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

घडसोली मैदान येथील “सुरभी चहा”चे सर्वेसर्वा संतोष पोटफोडे यांचे निधन


Back to top button
Don`t copy text!