
दैनिक स्थैर्य । दि. १० नोव्हेंबर २०२२ । गोखळी । श्रीराम सहकारी कारखाना निरा व्हॅली को-ऑपरेटिव्ह डिस्टलरी (अर्कशाळा) विभाग कायम कामगार पतसंस्था मर्यादित फलटण संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक २०२२-२३ ते २०२७-२८ बिनविरोध पार पडली असून चेअरमन पदी संतोष पंढरीनाथ खटके व व्हा. चेअरमन पदी रोहिदास रंगनाथ शिंदे यांची निवड झाली आहे.
संचालक मंडळावर संतोष पंढरीनाथ खटके, रोहिदास रंगनाथ शिंदे, भानुदास सुभेदार शेंडगे, संदीप रामराम जगताप, प्रकाश मुरलीधर सस्ते, चंद्रकांत कुंडलिक ढोले, बापूराव सदाशिव चव्हाण, नामदेव विठ्ठल नाळे, सागर गोरख रणवरे, कैलास मधुकर ढेंबरे, धोंडीराम महादेव भोईटे, शरद बबन गावडे, दिनेश दशरथ शेंडे या १५पैकी १३ जणांची बिनविरोध निवड झाली दोन जागा रिक्त आहेत. त्यामधून वरील प्रमाणे चेअरमन व व्हा. चेअरमन निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शेखर साळुंखे यांनी कामकाज पाहिले.
आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हा. चेअरमन नितीन भोसले यांनी नवनिर्वाचित चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालकांचे अभिनंदन केले आहे.