
दैनिक स्थैर्य । दि. ०७ सप्टेंबर २०२२ । मुंबई । आंबेडकरी चळवळीतील आदर्श व्यक्तिमत्त्व त्याचबरोबर बौद्धजन पंचायत समिती, शिवडी विभाग, गटक्रमांक १३ चे सरचिटणीस, बौद्धजन पंचायत समिती, शाखा क्रमांक २३८ चे अध्यक्ष, मौजे डेरवण, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी या गावचे सुपुत्र संतोष जाधव (डेरवणकर) यांचे हृदविकाराच्या झटक्याने के.ई.एम. रुग्णालय मुंबई येथे नुकतेच दुःखद निधन झाले.
दिवंगत संतोष जाधव यांच्या अंत्ययात्रेला समाजातील विविध स्तरातील लोक मोठया संख्येने सहभागी झाले होते, मनमिळाऊ, सर्वसमावेशक स्वभावाचे होते, समाजातील सर्वच स्तरातील लोकांशी त्यांचे घनिष्ठ संबंध असल्याने त्यांच्या अचानक जाण्याने समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे, त्यांच्या मागे पत्नी, दोन पदवीधर मुलगे असा परिवार आहे.
शिवडी विभागातील सर्वश्रुत भव्यदिव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूकीच्या रथाची व्यवस्था गेली ३५ वर्षे दिवंगत संतोष जाधव जातीने करत तसेच मिरवणुक कार्यात ही त्यांचे मोठे योगदान होते.
दिवंगत संतोष जाधव यांचा पुण्यानुमोदन विधी व शोकसभा रविवार दि. १८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ठीक १० वाजता माजी गटप्रमुख आणि बौद्धजन पंचायत समितीचे माजी चिटणीस प्रकाश कासे यांच्या अध्यक्षतेखाली ममता सोसायटी, शिवडी येथे आयोजित करण्यात आली आहे, तरी सर्वांनी मोठया संख्येने उपस्थित राहून आपल्या आदर्शास श्रद्धांजली अर्पण करावी अशी विनंती समीर सखाराम महाडिक यांनी शाखा क्रमांक २३८ च्या वतीने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.