
दैनिक स्थैर्य । दि. २४ ऑगस्ट २०२२ । फलटण । संत सेना महाराजांची पूजा व आरती विधवा महिलेच्या हस्ते करुन संत सेना महाराजांची पुण्यतिथी फलटण नाभिक समाजाच्या वतीने उत्साहात साजरी करुन वेगळा उपक्रम नाभिक समाजाने राबविला.
संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्ताने नाभिक समाजाने फलटण येथिल बुधवार पेठ मध्ये संत सेना महाराज मंदीरात भजन किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करणेत आला होता.
नाभिक समाजाच्या वतीने विधवा महिलेस सन्मानाची वागणूक देऊन त्यांच्या हस्ते पुजा व आरती करुन बारा वाजता सर्वानी संतसेना महाजांच्या मुर्तीवर पुष्पवृष्टी करणेत आली.संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्ताने नाभिक समाजाने आगळा वेगळा असा स्तुत्य उपक्रम राबविला.
पूर्वी विधवा महिलांचे केशओपन केले जायचे.या प्रथेस महात्मा जोतिराव फुले बरोबर नाभिक समाजाने विरोध करुन नाभिक समाजाचा हत्यारे न चालवण्याचा देशात पहिला संप केला होता.
आजही फलटण तालुक्यात नाभिक समाजाने विधवा महिलेच्या हस्ते संत सेना महाराज पुण्यतिथी दिनी संत सेना महारांजाची पूजा आरती करुन विधवांना सन्मानाची वागणूक देणारा फलटण तालुक्यातील नाभिक समाजाचा पहिला क्रांतिकारक निर्णय घेण्यात आला.