दैनिक स्थैर्य । दि. २६ फेब्रुवारी २०२२ । फलटण । संत शिरोमणी नरहरी महाराज जयंतीनिमित्त साखरवाडी पिंपळवाडी येथील सुवर्णकार समाज बांधवांनी विद्यानगर साखरवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज व संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.
विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ, पिंपळवाडी आणि स्वामी समर्थ भजनी मंडळ, ५ सर्कल यांच्या सभासदांनी उत्तम भाजन सेवा केली. दुपारी १२ वाजता उपस्थित भाविक व समाज बांधवांनी छ. शिवाजी महाराज व संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमांवर पुष्पवृष्टी केली व नंतर आरती करण्यात आली.
संत नरहरी महाराज यांच्या जीवन चरित्रावर रविंद्र वेदपाठक यांनी लिहिलेल्या श्री संत नरहरी महाराज चरित्रामृत या पुस्तकाचे प्रकाशन ग्राहक पंचायत पदाधिकारी किसनराव भोसले, ज्येष्ठ नागरिक संघाचे डॉ. खानविलकर, महाराष्ट्र प्रवासी महासंघाचे सोमनाथ माघाडे, ह. भ. प. किसनराव वेदपाठक, ह. भ. प. प्रकाश पवार, दीक्षित सर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास ग्राहक पंचायत डॉ. विशाल नाळे, अड. गणेश फडतरे, उमेश बावकर, जे. डी. जाधव, दासा राऊत, दिवटे गुरुजी, अरविंद भोसले, भजनी मंडळ तालुकाध्यक्ष नामदेव गायकवाड, खादी ग्रामोद्योग संचालक दादासाहेब रणदिवे, समाज बांधव, शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.