दैनिक स्थैर्य । दि. २३ ऑक्टोबर २०२२ । सातारा । येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमधील मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.सुभाष वाघमारे यांच्या ‘’संविधांनाच्या स्वप्नातलं गाव’ या प्रबोधनपर कवितासंग्रहास महाराष्ट्रात उत्कृष्ट असे १३ साहित्यपुरस्कार मिळालेले असतानाच समृद्धी प्रकाशन हिंगोलीने आयोजित केलेल्या संत नामदेव साहित्य पुरस्कार स्पर्धेत या कवितासंग्रहास संत नामदेव राष्ट्रीय काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कार समितीचे संयोजक शिवाजी महाविद्यालय हिंगोली येथील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.श्रीराम कराळे यांनी विविध पुरस्कार निवडीची यादी २२ ऑक्टोबर २०२२ रोजी जाहीर केली. त्यांच्या कवितासंग्रहास हा १४ वा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.विठ्ठल शिवणकर,शिवाजी ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस,रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील, सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे, प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये,उपप्राचार्य डॉ.अनिलकुमार वावरे,उपप्राचार्य डॉ.रोशनआरा शेख,उपप्राचार्य डॉ.रामराजे माने देशमुख शिवाजी विद्यापीठ मराठी विभागातील मराठी विभाग प्रमुख डॉ.नंदकुमार मोरे ,प्रा.डॉ.रणधीर शिंदे, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ.प्रकाश दुकळे, शिविमचे माजी अध्यक्ष,डॉ.शिवकुमार सोनाळकर यांनी अभिनंदन केले.
प्रा.डॉ.सुभाष वाघमारे हे मुळचे मळोली.ता.माळशिरस .जिल्हा सोलापूर या गावचे रहिवासी असून त्यांचे शिक्षण छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये झाले. त्यांनी गावी समता प्रतिष्ठान सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सेवाभावी कार्यात योगदान दिले. ३२ वर्षे रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी नरेंद्र दाभोलकर यांनी सुरु केलेल्या विवेक वाहिनी सारख्या विधायक कार्य करणाऱ्या विकास उपक्रमात कार्य केले आहे.अलीकडे 5 जून २०२१ रोजी त्यांच्या संविधानाच्या स्वप्नातलं गाव या कवितासंग्रहाचे प्रकाशन ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस व रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांच्या हस्ते झाले होते.या कविता संग्रहास वाचन संस्कृती प्रतिष्ठान श्रीरामपूरचा राज्यस्तरीय समाज प्रबोधन पुरस्कार,छत्रपती शिवाजी कॉलेजचा सर्जनशील साहित्य लेखन पुरस्कार,तसेच गारगोटी येथील न्यूज पेपर गंगाधर पुरस्कार, तरवडी येथील सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील साहित्य पुरस्कार, शब्दकळा साहित्य संघ मंगळवेढा यांचा काव्य पुरस्कार,श्रीरामपूर येथील प्रकाश किरण पुरस्कार, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचा ललित साहित्य पुरस्कार, फलटण येथील उर्कृष्ट साहित्य सेवा पुरस्कार,सृष्टी साहित्य पुरस्कार अकोला ,वामनदादा कर्डक राष्ट्रीय पुरस्कार ,पुणे येथील स्वातंत्र्य सैनिक आबक पुरस्कार, अश्वमेध ग्रंथालय सातारा अक्षर गौरव पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र साहित्यसभेचा विशेष साहित्य पुरस्कार व आताचा संत नामदेव राष्ट्रीय काव्य पुरस्कार असे १३ पुरस्कार यापूर्वी मिळाले आहेत. साहित्यविश्व प्रकाशनचे प्रकाशक विक्रम शिंदे,डॉ.संजयकुमार सरगडे,तारुण्यवेध संघटनेचे विशाल पोखरकर ,छत्रपती शिवाजी कॉलेजचा स्टाफ,समता प्रतिष्ठान सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते,भीमराव मोरे,तुकाराम लोखंडे,डॉ.गोरख बनसोडे, फर्गुसन कॉलेजचे उपप्राचार्य डॉ.प्रकाश पवार, भिनवाडा कादंबरीचे लेखक बाळासाहेब कांबळे,प्रा.युवराज खरात,तुषार बोकेफोडे,रोहित आवळे,प्रा.डॉ.आर.ए.कुंभार सम्यक शाक्यरत्न,मळोली गावातील हितचिंतक ग्रामस्थ,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते,लुंबिनी संघ सातारा,शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर,शिक्षक हितकारणी संघटना पुणे,तसेच कॉलेज व शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले.