दैनिक स्थैर्य | दि. ११ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
फलटण तालुका चर्मकार विकास संघातर्फे रविवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.१० वाजता संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम नवलबाई मंगल कार्यालय, मारवाड पेठ, फलटण येथे आयोजित केला आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, आमदार दीपकराव चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. तसेच सुरवडीचे गावचे उद्योजक ज्ञानेश्वर डोळस, महाराष्ट्र राज्य का.वि.ब. सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष रोहिदास पवार, माजी नगरसेविका सौ. ज्योती खरात, आस्था टाईम्सचे संपादक दादासाहेब चोरमले, फलटण पं.स.चे सदस्य सचिन रणवरे, माजी नगरसेविका सौ. वैशाली चोरमले, उद्योजक संदीप चोरमले, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर सिव्हील इंजिनीअर विकास निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन फलटण तालुका चर्मकार विकास संघातर्फे करण्यात आले आहे.