दैनिक स्थैर्य । दि. १२ मे २०२२ । फलटण । दुधेबावी, ता. फलटण येथील ग्रामविकास प्रतिष्ठानच्यावतीने दुधेबावी फेस्टिव्हल अंतर्गत संत गाडगेबाबा व्याख्यानमाला गुरुवार दि. १२ ते सोमवार दि.१६ मे दरम्यान दररोज सायंकाळी ७ वाजता होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर, व्याख्यानमाला कमिटीचे अध्यक्ष डॉ. सागर कराडे यांनी दिली आहे.
२० वर्षे अखंडित सुरु असलेल्या या व्याख्यानमालेचे उद्घाटन जलसंपदा विभागाच्या अव्वर सचिव सौ. विशाखा आढाव – भोने यांचे हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी प्रंताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. शिक्षण विभागाचे उपसंचालक देविदास कुलाळ, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उजनी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, नातेपुते पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलिस पाटील संघटना प. महाराष्ट्र उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सुभाषराव सोनवलकर, पाटबंधारे खात्यातील निवृत्त अधिक्षक अभियंता दिनकरराव सोनवलकर, सरपंच मधुकर वावरे, उपसरपंच भाऊसाहेब मोरे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दि.१२ मे रोजी युवा व्याख्याते, समाज परिवर्तनकार, प्रा. वसंतराव हंकारे, सांगली यांचे “महापुरुषांच्या विचारांची धग” या विषयावर व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा परिषद उप मुख्यकार्यकारी अधिकारी मनोज जाधव आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून फलटण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. रमेश आढाव उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवार दि. १३ मे रोजी सौ. करिश्मा आटोळे – गावडे यांचे “आई घराचे मांगल्य, वडील घराचे आस्तित्व” या विषयावर व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी सातारचे सिव्हील सर्जन डॉ. सुभाष चव्हाण आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार सुभाषराव भांबुरे, सामाजिक कार्यकर्ते किरण सोनवलकर, दादा मदने उपस्थित राहणार आहेत.
शनिवार दि.१४ रोजी पाठ्य पुस्तकातील प्रसिद्ध कवी हणमंत चांदगुडे यांचे “कविता तुमच्या आमच्या जगण्याची” या विषयावर व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी फलटणचे तहसिलदार समीर यादव आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार किरण बोळे, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कस फेडरेशनचे संयुक्त सचिव नानासाहेब सोनवलकर उपस्थित राहणार आहेत.
रविवार दि.१५ रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रित सदस्य, प्रसिद्ध कथा कथनकार प्रा. रविंद्र कोकरे यांचे “व्यथा माणसाच्या, कथा जगण्याच्या” या विषयावर व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी मुंबईचे आयकर सहआयुक्त तुषार मोहिते आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार यशवंत खलाटे, दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचे संचालक भानुदास सोनवलकर उपस्थित राहणार आहेत. सोमवार दि. १६ रोजी चांडाळ चौकडीच्या करामती या प्रसिद्ध वेबसिरीजचे दिग्दर्शक रामभाऊ जगताप यांचे “कला क्षेत्रातील युवकांपुढील आव्हाने” या विषयावर व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) फलटण सुनिल धायगुडे आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार नसीर शिकलगार, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दत्तात्रय दडस उपस्थित राहणार आहेत.
या ज्ञानशृंखलेस उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विजयकुमार नाळे, सचिव विठ्ठल सोनवलकर, कार्याध्यक्ष संतोष भांड, खजिनदार डॉ. युवराज एकळ, सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष सचिन सोनवलकर, शेखर चांगण, कांता सोनवलकर यांनी केले आहे.