दैनिक स्थैर्य | दि. 16 जानेवारी 2025 | फलटण | नवी दिल्ली स्थित केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय मार्फत दिल्या जाणार्या संस्कृत शिष्यवृत्तीसाठी फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलचे आठ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या शिष्यवृत्तीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याला रुपये पाच हजार मंजूर करण्यात आले आहे.
शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी
क्षीरसागर श्रीराम केशव (इयत्ता नववी ब), कु.बडवे श्रीया शितल (इयत्ता नववी ब), तगारे श्रीपाद मयूर (इयत्ता नववी ब), जाधव साहिल नंदकुमार (इयत्ता नववी ब), कु. पवार रिया अशोक (इयत्ता नववी ब), अब्दागिरे प्रणव दत्तात्रेय (इयत्ता नववी ब), सोडमिसे हर्षद तुळशीराम (इयत्ता नववी ब), कु.निंबाळकर प्रगती गजानन (इयत्ता दहावी ब)
या विद्यार्थ्यांना प्रशालेच्या सौ. तगारे एस. एम यांनी मार्गदर्शन केले. या उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती सविता काकी सुभाषराव सूर्यवंशी -बेडके, संस्थेचे मानद सचिव सचिन सुभाषराव सूर्यवंशी – बेडके, नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी – बेडके, सदस्या सौ. ज्योतीताई सचिन सूर्यवंशी – बेडके तसेच प्रशालेचे प्राचार्य एस. बी. थोरात, उपप्राचार्य पी. डी. घनवट, पर्यवेक्षक के. एच. खरात यांनी केले आहे. त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
ही शिष्यवृत्ती मिळाल्याने विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेच्या अभ्यासात आणखी उत्साह आणि प्रेरणा मिळेल, असे विद्यालयाच्या प्राचार्य एस. बी. थोरात यांनी सांगितले. या यशाने विद्यालयाच्या शैक्षणिक धोरणांची पुष्टी झाली आहे आणि भविष्यातही असे यश संपादन करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.