
स्थैर्य, सातारा, दि. 1 ऑक्टोबर : येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व संस्कार भारतीच्या साहित्य विधा यांच्यातर्फे सृजनाचा उत्सव नवरात्र या विषयावर काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे शनिवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृह येथे हे काव्यसंमेलन होणार आहे यावेळी कांता भोसले, मुकुंद फडके उपस्थित राहणार असून नवोदित कलाकारांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा देवी करणार आहेत. काव्यरसिकांनी आणि कवींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्कार भारतीच्या साहित्य विधातर्फे सुरेखा कुलकर्णी यांनी केले आहे.