
दैनिक स्थैर्य | दि. १३ जुलै २०२३ | फलटण |
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, संघर्ष करण्याची हिम्मत ठेवून, आपले ध्येय निश्चित करून स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावर संकेतकुमार भांडवलकर यांनी २०२१ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत मंत्रालय लेखनिक पद यशस्वीपणे प्राप्त केले.
त्यांच्या या यशाबद्दल माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, विधान परिषदेचे माजी सभापती व तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपकराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, शाहूजी मदने यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, जिवलग मित्र, कुटुंबीय, आई-वडील, आजी यांच्याकडूनही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.