![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2025/02/33a25d7d-3420-441e-857a-d963657b6bfa.jpg?resize=780%2C470&ssl=1)
दैनिक स्थैर्य | दि. १० फेब्रुवारी २०२५ | फलटण | सातारा जिल्ह्यातील जेष्ठ नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर विभागाने गेल्या काही दिवसांपासून छापे टाकले होते, या चौकशीच्या फेऱ्यातून बाहेर येताच ते समाजातील विविध कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे भाग घेत आहेत. हे त्यांच्या समाजाप्रती असलेल्या आस्था व प्रेमाचे प्रतीक आहे.
गोविंद मिल्कच्या अनुषंगाने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकले होते, या चौकशीच्या कारवाईत तब्बल ५ दिवस लागले होते. या कारवाईनंतरही ते समाजातील विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेत आहेत.
आयकर विभागाच्या चौकशीतून बाहेर पडल्यानंतर, श्रीमंतनं संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या गराड्यातून बाहेर पडून थेट फलटण येथील पत्रकार कॉलनीमध्ये जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांच्या निवासस्थानी पोहचले व त्यांना वयाची 75वी वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
त्यांनी मुधोजी क्लब येथे डॉक्टरांच्या सुरु असलेल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलचा शुभारंभ केला. या स्पर्धेमध्ये अनेक डॉक्टरांनी भाग घेतला होता आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीने स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
नंतर, ते सुरेंद्र सहस्त्रबुद्धे यांचे सुपुत्र सुदीप आणि कैलासचंद्र कचरे यांची सुकन्या श्रेया यांच्या सजाई गार्डन येथील स्वागत समारंभास उपस्थित राहून शुभाशीर्वाद दिले.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची ही सक्रियता त्यांच्या धडाडीच्या नेतृत्वाचे प्रतीक आहे. आयकर विभागाच्या चौकशीच्या फेऱ्यातून बाहेर येताच ते समाजातील विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेत आहेत, हे त्यांच्या समाजाप्रती असलेल्या आस्था व प्रेमाचे प्रतीक आहे.