हक्कभंग नोटिसीला संजय राऊतांचे उत्तर; सविस्तर खुलासा करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी


दैनिक स्थैर्य । दि. ०८ मार्च २०२२ । मुंबई । केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने दिला. संसदेत पक्षनेतेपदावरून संजय राऊतांना हटवण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली. संजय राऊतांच्या जागी गजानन कीर्तिकरांच्या नावाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी, विधिमंडळ नाही चोरमंडळ आहे, असा उल्लेख केला. यानंतर भाजप आणि शिंदे गटाने आक्रमक होत संजय राऊत यांच्याविरोधात विधिमंडळात हक्कभंग आणला. यासंदर्भात एक समिती स्थापन करण्यात आली. हक्कभंगाच्या नोटिसीला आता संजय राऊतांनी उत्तर दिले आहे.

संपूर्ण विधिमंडळाबाबत कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नसून माझे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतेच मर्यादित आहे, हे कृपया लक्षात घ्यावे. तरीही या प्रकरणाबाबत सविस्तर खुलासा करण्याबाबत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाला एक पत्र दिले असून, यामध्ये आपले म्हणणे मांडले आहे. नेमके संजय राऊत पत्रात काय म्हणाले?


Back to top button
Don`t copy text!