‘तुम मुझे वोट दो, हम तुम्हे व्हॅक्सिन देंगे’ हा भाजपचा नवा नारा असल्याचे म्हणत संजय राऊतांचे मोदी सरकारवर टीकास्त्र

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबईम दि.२३: बिहार विधानसभा निवडणुकांचे
बिगुल वाजले आहे. नुकताच येथील जाहीरनामा प्रसिद्ध झाला. यामध्ये भाजपने
मतदारांना कोरोनाची मोफत लस देण्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनानंतर
आता राजकारण तापले असल्याचे दिसत आहे. भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये सत्ता
आल्यास बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची मोफत लस देऊ, असे आश्वासन
देण्यात आले आहे. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊतांनी मोदी सरकारला लक्ष्य
केले आहे.

माध्यमांशी
बोलताना संजय राऊतांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘आम्ही लहान असताना
तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा असा नारा होता. पण आता तुम मुझे वोट
दो मै तुम्ही व्हॅक्सिन दुंगा असा नवा नारा आला असल्याचे म्हणत त्यांनी
भाजपला टोला लगावला आहे.

संजय
राऊतांना प्रश्न विचारण्यात आला की, ज्या राज्यात भाजपचे सरकार नाही तिथे
व्हॅक्सिन मिळणार नाही का? यावर राऊत म्हणाले की, डॉ. जे. पी. नड्डा, डॉ.
हर्षवर्धन, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून स्पष्ट करुन घ्यावे
लागेल. तसेच मी मोदींचे भाषण ऐकले होते त्यात ते म्हणाले होते की,
व्हॅक्सिन आल्यावर ती घराघरापर्यंत पोहोचवण्यात येईल. मात्र आता नवीन
पॉलिटिकल सिस्टम बनवली जातेय. जिथे भाजपचे सरकार असेल. जिथे भाजपलाच वोट
जाईल. त्यांनाच व्हॅक्सिन दिली जाईल. हा सर्व संशोधनाचा विषय आहे.’

पुढे
राऊत म्हणाले की, ‘मी शाळेत असताना तुम मुझे खून दो मै तुम्ही आझादी दुंगा
अशी घोषणा होती. आता नवीन घोषणा आली आहे. तुम मुझे वोट दो हम तुम्ही
व्हॅक्सिन देंगे. अशा प्रकारे या देशात एखादा राजकीय पक्ष भेदभाव करेल.
म्हणजे जो वोट देणार त्याला लस मिळेल. जो नाही देणार त्याला लस नाही. ही
क्रुरता आहे. असे म्हणत राऊतांनी निशाणा साधला.

जर
बिहारमध्ये ज्या लोकांनी दुसऱ्या पक्षाला वोट दिले तर त्यांना लस दिली
जाणार नाही. या देशाला व्हॅक्सिनच्या नावावर विभागण्याची तयारी सुरू आहे
का? असा सवालही संजय राऊतांनी विचारला आहे. रोटी, कपडा, मकान या गोष्टी ठिक
आहे. पण व्हॅक्सिन हा राजकारणाचा मुद्दा बनवला जात आहे. यामुळे
पंतप्रधानांची जी आपल्या मनात प्रतिमा आहे, त्या प्रतिमेला ठेच पोहोचत आहे.
हे वक्तव्य मोदींच्या प्रतिमेला ठेच पोहोचवणारे असल्याचेही संजय राऊतांनी
म्हटले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!