संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारला आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य ,मुंबई, दि, २८: बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील पूजा चव्हाण या तरुणीचा पुण्यात मृत्यू झाला आहे. या गूढ मृत्यू प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. ठाकरे सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्यावर विरोधकांचा स्पष्ट रोख आहे. संजय राठोड व पूजा चव्हाण या तरुणीचे संबंध असल्याचे काही फोटो व व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. सोशल मिडीयावर देखील संजय राठोड यांनीच पूजा चव्हाणला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा सूर उमटत असल्याचे चित्र गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे.

दरम्यान, संजय राठोड यांच्या विरोधात गेले अनेक दिवस भाजपचे नेते आक्रमक झालेले पाहायला मिळत होते. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या संदर्भात आक्रमक भूमिका मांडत आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील त्या वारंवार करत आहेत.

यामुळे दबावात असलेल्या शिवसेनेला त्यांचा राजीनामा घेतल्या शिवाय सध्या तरी कोणताही पर्याय समोर नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे संजय राठोड यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवास्थानी बोलवून राजीनामा देण्यासाठी सांगितले असल्याची माहिती मिळत आहे.

संजय राठोड यांनी राजीनामा द्यायला तयार असल्याचे देखील सांगितले आहे. परंतु जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही त्यांच्यावरचे आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत राजीनामा मंजूर करू नये, अशी अट संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे घातलेली असल्याची माहिती मिळत होती.

परंतु आता संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला असल्याची माहिती मिळत आहे. संजय राठोड हे सपत्नीक वर्षा निवास्थानी गेले आहेत. राजीनामा मंजूर करू नये म्हणून राठोड व त्यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांकडे भावनिक आवाहन केले होते.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषेद घेतलेली आहे यामध्ये ते बोलत आहेत, यावेळी त्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्या पासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. यावेळी त्यांना विरोधकांना सामोरे जायचे आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील नेत्यांशी चर्चा करून संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर केलेला असल्याची माहिती मिळत आहे.


Back to top button
Don`t copy text!