
दैनिक स्थैर्य । 14 मार्च 2025। गोखळी । जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी संजयकुमार बाचल तर व्हाईस चेअरमनपदी प्रशांत फडतरे यांची बिनविरोध निवड झाली.
या पतसंस्थेची 1 हजार सभासद संख्या असून ही शासकीय कर्मचार्यांच्या पतसंस्थेपैकी एक अग्रगण्य आहे. पंचवीस कोटी वार्षिक उलाढाल असलेल्या या संस्थेने स्थापनेपासून आज अखेर सतत ऑडिट वर्ग मिळाला आहे. या संस्थेत अशा पतसंस्थेत आदर्श विस्तार अधिकारी पुरस्काराने सन्मानित संजयकुमार बाचल यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड आहे.
या निवडीबद्दल त्यांचे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शिवरुपराजे खर्डेकर, विश्वास दादा गावडे, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे, मनोज तात्या गावडे, नंदकुमार गावडे, संतोष दादा गावडे, राजेंद्र भागवत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, कोरेगावच्या गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, गटविकास अधिकारी महेंद्र सपाटे, अभिजीत चव्हाण, विजयराव निंबाळकर, संदीप सावंत सुनील पार्टे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.