मराठी साहित्य मंडळाकडून दहिवडी चे संजय खरात यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.१५ एप्रिल २०२२ । दहिवडी । जि. प. प्राथ. शाळा वडगावचे  दहिवडी मुख्याध्यापक व घरोघरी शाळा उपक्रमाचे प्रणेते श्री. संजय खरात यांना सरकारमान्य मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेकडून सातारा येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात  सावित्रीबाई फुले विद्याभूषण पुरस्कार – 2022 या पुरस्काराने सन्मानचिन्ह व सन्मानपत्र  देवून सन्मानीत करण्यात आले.
अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या सरकारमान्य मराठी साहित्य मंडळाकडून सातारा येथील जिजामाता ज्यु. कॉलेज ऑफ एज्युकेशन , सातारा येथे काव्य संमेलन व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मराठी साहित्य संमेलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर ऊर्फ कवी गोलघुमट यांच्या शुभहस्ते व ज्येष्ठ पत्रकार राहुल खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
संजय खरात यांनी आजपर्यंत केलेल्या विविध सामाजिक कार्याची तसेच कोरोना काळात ‘घरोघरी शाळा’ या उपक्रमद्वारे केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक कामाची  दखल घेवून  त्यांना सदरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Back to top button
Don`t copy text!