
दैनिक स्थैर्य | दि. १ ऑगस्ट २०२४ | फलटण |
फलटण नगरपरिषद सभागृह येथे तीन सफाई कर्मचारी श्री. अनिल किसन डांगे, सौ. दीपमाला रमेश वाघेला, कर्वे मॅडम या तिघांचा मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सफाई कामगार संघटनेचे पुणे विभागीय अध्यक्ष राजू मारुडा म्हणाले की, या तिघांनी फलटण नगरपरिषद येथे उत्कृष्ट सेवा केली आहे. त्यांचे पुढील आयुष्य चांगले जावे ही ईश्वरचरणी प्रार्थना.
या कार्यक्रमास फलटण नगर परिषदेचे अधिकारी तेजस पाटील, उपमुख्याधिकारी वर्षा बडदरे, कर निरीक्षक साधना पवार, आस्थापनाप्रमुख धन्वंतरी साळुंके, विद्युत अभियंता मुस्ताक महात, सहकार्यालय निरीक्षक प्रकाश तुळशे, स्वच्छता निरीक्षक विजय मारुडा, आस्थापना लिपीक राकेश गलियल, पेन्शन लिपिक रुपेश इंगळे, आस्थापना लिपीक शिंदे, शिरतोड, संघटनेचे अध्यक्ष फलटण शहर मनोज मारुडा, रमेश वाघेला उपाध्यक्ष फलटण शहर, अनिल डांगे, विनोद मारुडा, सूरज मारुडा, चंदूभाई मारुडा, फलटण नगर परिषदेचे अधिकारी, बांधकाम विभाग संघटनेचे पदाधिकारी, सफाई कर्मचारी उपस्थित होते, अशी माहिती संघटनेचे सचिव नितीन वाळा दिली आहे.