वेट लिफ्टिंगमध्ये बारामतीची सानिका मालुसरे प्रथम


दैनिक स्थैर्य । दि. ०१ मार्च २०२२ । बारामती । विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मधील बी. ए. ची विद्यार्थ्यांनी कु. सानिका राजेंद्र मालुसरे हिने अनेक्विपड पॉवरलेफ्टींग स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब वडगाव मावळ आयोजित पुणे जिल्हा पॉवर लिफ्टींग असोसिएशनच्या मान्यतेने कै. नारायणराव सद्गुरू ढोरे यांच्या स्मरणार्थ भव्य जिल्हास्तरीय अनेक्विपड पॉवरलेफ्टींग स्पर्धा सब ज्युनिअर/ ज्युनिअर/ सिनियर/ मास्टर, मुले, मुली यांची स्पर्धा रोजी वडगाव मावळ येथे संपन्न झाली.

या भव्य स्पर्धेत झालेल्या पुणे जिल्हा पॉवर लिफ्टिंग येथे ६९ च्या आतील वजन गटामध्ये सानिका मालुसरे हिने जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल पटकावले आहे. पुढे तिची राज्य स्तरावर निवड झाली असून मार्गदर्शन क्रीडा प्रशिक्षक दिनेश सरोदे व तावरे फिटनेस झोन यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!