
दैनिक स्थैर्य | दि. २० ऑक्टोबर २०२३ | फलटण |
आज बारामतीहून फलटणकडे युवक नेते सनीभाऊ काकडे व त्यांचे सहकारी येत असताना त्यांना मांडुळ जातीचा एक दुर्मिळ साप जखमी अवस्थेत सापडला. त्यांनी ताबडतोब याची माहिती फलटणचे वरिष्ठ वन अधिकारी यांना देऊन हा साप त्यांनी वनखात्याकडे सुपूर्द केला. त्यामुळे या सापाला जीवदान मिळाले आहे.
मांडुळ या दुर्मिळ सापाबाबत समाजात काही लोकांकडून चुकीचे गैरसमज पसरवले गेले आहेत. या मांडुळ सापावर जादूटोणा करून श्रीमंत होता येते, पैशांचा पाऊस पडतो, अशाप्रकारचे थोतांड आहेत; परंतु हे सगळे खोटे आहे आणि मोठी अंधश्रद्धा आहे. त्यामुळे या शेतकरी राजाच्या मित्राला नवीन जीवदान देऊन वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या हवाली केले गेले.
यावेळी आझाद समाज पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व कामगार संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सनीभाऊ घनश्याम काकडे, चेअरमन सुधीर अहिवळे, पत्रकार अजय साळवे, अमरभाऊ झेंडे, विक्की काकडे, सूरजभाऊ भैलुमे, अभय मुळीक, किरण शिंदे, अमर धुमाळ आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.