काँग्रेस (आय) पक्षाच्या ग्राहक संरक्षण सेल जिल्हाध्यक्षपदी संग्राम जाधव


दैनिक स्थैर्य । दि. ०७ ऑक्टोबर २०२२ । पंढरपूर । काँग्रेस (आय) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कार्याध्यक्षा आ.प्रणितीताई शिंदे, जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, यांच्या आदेशान्वये काँग्रेस (आय) ग्राहक संरक्षण सेलच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी संग्राम जाधव यांची निवड करण्यात आली आहे. नुकतेच त्यांना निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष नितीन भाऊराव पाटील यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आले.

संग्राम जाधव हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रीय असुन जनसेवा संघटनेच्या माध्यमातुन विविध सामाजिक उपक्रम राबवत त्यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवून दिलेली आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यांनी आजतागायत भरीव कार्य केलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर काँग्रेस (आय) पक्षाच्या ग्राहक संरक्षण सेल सोलापूर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

निवडीनंतर संग्राम जाधव यांनी ग्राहकांच्या हितासाठी भरीव कार्य करु आणि काँग्रेस (आय) पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे कार्य करु. असा विश्‍वास व्यक्त केला. यावेळी काँग्रेस (आय) च्या सर्व वरिष्ठांनी, पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.


Back to top button
Don`t copy text!