
दैनिक स्थैर्य | दि. २८ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
पुणे येथे स्वारगेट बसस्थानकावर घडलेल्या घटनेचा संगिनी फोरम, फलटण संस्थेने तीव्र निषेध केला आहे. ही घटना अतिशय निंदनीय आहे, असे फोरमच्या अध्यक्षा सौ. अपर्णा जैन यांनी म्हटले आहे.
संबंधित नराधम आरोपीस पोलिसांनी लवकरात लवकर अटक करून जास्तीत जास्त कडक शिक्षा लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच महिलांनी आता अबला न राहता सबला व्हावे व आपणच आपले संरक्षण कसे करता येईल, याकडे लक्ष देऊन आत्मसंरक्षणासाठी सिद्ध झाले पाहिजे, असे आवाहन केले आहे.