दैनिक स्थैर्य | दि. ९ मार्च २०२४ | फलटण |
जागतिक महिला दिनानिमित्त फलटणमधील प्रसिध्द फडे हॉस्पिटलमधील २५ परिचारिका व मदतनीस यांचा प्रशस्तीपत्र, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन संगिनी फोरम, फलटण यांच्याकडून सत्कार करण्यात आला. यावेळी महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा फोरमने दिल्या.
फलटण शहर पोलीस निरीक्षक शहा यांच्या सुविद्य पत्नी रिना शहा, संगिनी अध्यक्षा अपर्णा जैन, सचिव प्रज्ञा दोशी, खजिनदार मनिषा घडिया, माजी अध्यक्षा संगिता दोशी, नीना कोठारी यांच्या हस्ते परिचारिका, मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला. संगिनी सदस्या ममता शहा यांनी महिला दिनानिमित्त विशेष व्याख्यान देऊन परिचारीकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी संगिनी सदस्या ममता शहा, नीता दोशी, जयश्री उपाध्ये, संगीता जैन, सारिका दोशी, दीपिका व्होरा, संध्या महाजन, वृषाली गांधी, नेहा दोशी उपस्थित होत्या. यावेळी फडे हॉस्पिटलच्या सर्वेसर्वा डॉ. अंजली फडे यांचाही सत्कार करण्यात आला.
सत्काराबद्दल सर्व परिचारीकांनी संगिनी फोरमला धन्यवाद दिले. रिना शहा, डॉ. फडे यांनी संगिनीच्या उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले.