सांगवी ता. फलटण गावठी बनावटीचे पिस्टल विक्री करणेकरीता आलेल्या इसमास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा : एक इसम गावठी बनावटीचे पिस्टल घेवून बारामती – फलटण रोडवरील सांगवी ता.फलटण जि.सातारा येथे विक्रीकरीता घेवून येणार आहे. अशी बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांचे अधिपत्याखाली एक पथक तयार करुन सदर ठिकाणी जावून काही आक्षेपार्ह मिळून आल्यास कारवाई करणेबाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे आनंदसिंग साबळे यांच्या पथकाने मिळाले बातमी ठिकाणी जावून सापळा रचला असता सुमारे २३.०० वा.चे दरम्यान सांगवी ता.फलटण येथे रोडवर एक इसम संशयितरित्या फिरताना मिळून आला त्यास थांबण्याचा इशारा केला असता तो तेथून पळूनजाण्याचा प्रयत्न त्याने केला. पोलीस पथकाचे सहाय्याने शिताफीने ताब्यात घेतले त्याचेकडे चौकशी करून त्याची झडती घेतली असता त्याचे कब्ज्यात बेकादेशीर बिगरपरवाना एक गावठीबनावटीचे पिस्तूल व पाच जिवंत काडतूस मिळून आले त्याचेकडे सदर पिस्तूलबाबत चौकशी केली असता त्याने ते गावठिबनावटीचे पिस्तूल विक्री करीता घेवून आणले असल्याचे सांगितले.

सदरील कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिलेल्या सूचनांनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंदसिंग साबळे, पोलिस हवालदार विनोद गायकवाड, सुधीर बनकर, पोलिस नाईक मोहन नाचन, संतोष जाधव, गणेश कापरे, पोलिस कॉन्स्टेबल वैभव सावंत, मोहसीन मोमीन, गणेश कचरे यांनी सहभाग घेवून केली.

सदर संशीयत इसमाकडून एक बेकादेशीर बिगरपरवाना गावठीबनावटीचे पिस्तूल व पाच जिवंत काडतूस असा सुमारे ८२,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर इसमाविरुध्द फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केला आहे व पुढील कारवाई करीता फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!