सोनगाव सोसायटीच्या चेअरमनपदी संदीप पिंगळे यांची बिनविरोध निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 22 मार्च 2025। फलटण । सोनगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी संदीप पिंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पोपटराव बुरुंगले राजीनामा दिलेल्या रिक्त पदावर त्यांची निवड झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संतोष गोरवे तर प्रमुख पाहुणे म्हणून सदाशिव जाधव होते.

यावेळी चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल संदीप पिंगळे यांचा, तसेच आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित धनाजी मोरे व सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिका पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ. मनिषा पवार यांच्यावतीने त्यांचे पती श्री संदीप पवार यांचा सत्कार करण्यात आला.

संदीप पिंगळे म्हणाले, ग्रामस्थ व सोसायटीच्या सदस्यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास कधीच तुटू देणार नाही. समाजहितासाठी वसोसायटीच्या प्रगतीसाठी अहोरात्र कार्यरत राहीन.

धनाजी मोरे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असून आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याने माझ्या जबाबदारीत अधिक वाढ झाली आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सत्कारमूर्तींच्या कार्याचा गौरव केला.

कार्यक्रमास शासकीय अधिकारी गरूडकर, सोसायटीचे सचिव महानवर, पोपटराव बुरुंगले, विकास पाटील, योगेश एजगर, अक्षय थोरात, सुनील पाटील, जय्याप्पा बेलदार, चंद्रकांत निकाळजे, बाळासाहेब ओवाळ, योगेश बुरुंगले, सुखदेव बेलदार, सौ. आशाताई थोरात, राजेंद्र टेंबरे, श्रीकृष्ण बंडगर, रामचंद्र बेलदार, सुखदेव बेलदार, यशवंत धायगुडे, महादेव कदम, महादेव लवटे, गोरख लवटे, बाबा लवटे, रमेश जगताप, रमेश जगताप, बापू पाटील, अरुण लांडगे, शिवाजी भोसले , राहुल बेलदार, दीपक बेलदार,संदीप बेलदार, हनुमंत थोरात, शंकर पिंगळे, दयानंद पिंगळे, ज्ञानदेव थोरात, नितीन पिंगळे, प्रकाश पिंगळे, मनोज मोरे, संतोष मोरे , महादेव पिंगळे, अतुल पिंगळे, अक्षय बेलदार, मनोज बल्लाळ, शहाजी सुळ, सचिन शेवते, कानिफनाथ वाघ , सुरेश पवार, कांतीलाल चव्हाण, रमेश मदने, राजेश निकाळजे, राजेंद्र आडके, रामहरी पिंगळे, हनुमंत ननावरे, दत्तात्रय ननावरे, आनंदा ननावरे, महादेव चव्हाण, जयवंत खरात, दत्तात्रय कदम, संजय वाघमोडे, बाबासो टेबरे, मधुकर लांडगे, सुनील यादव, अनिल यादव, संदीप शेंडे, भगवान जगदाळे, बबनराव निकाळजे, लखन पिंगळे, राहुल यादव, राजेंद्र पाटोळे, अमर भोसले, सागर पाटोळे , अतुल पाटोळे,लक्ष्मण गायकवाड, कांतीलाल चव्हाण , सुधीर ओव्हाळ, अमोल तुपे , हनुमंत टेबरें, संतोष आडके, अमर टेंबरे, सोमनाथ गायकवाड, अनिल रिटे, सुनील रिटे, बाळकृष्ण रिटे, करण गोरवे आदी मान्यवर उपस्थित होते.

नुतन पदाधिकार्‍यांचे विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दिपकराव चव्हाण यांच्यासह सर्व तरुण मंडळ, श्री विठ्ठल प्रासादिक भजनी व भारूड मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.पोपटराव बुरुंगले यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन व नियोजन प्रा राजेश निकाळजे यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!