स्थैर्य, सातारा, दि. 12 : मराठा समाजातील विविध प्रश्नांबाबत आवाज उठवून न्याय मिळवून देणार्या सकल मराठा संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी संदिप माने यांनी नुकतीच निवड करण्यात आली. सातारा येथील मराठा संघाच्या कार्यालयात नुकत्याच विविध पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी संदिप माने यांना जिल्हा उपाध्यक्षपदी निवडी झाल्याबाबतचे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
सातारा येथील कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत हा समारंभ पार पडला. सदर कार्यक्रम सकल मराठा संघाचे संस्थापक/अध्यक्ष अशोक धनावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव राजेश नायडू, युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पार्टे व विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष राहूल घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मराठा समाजातील विविध प्रश्नांसंदर्भात जागरूकतेने आवाज उठवून समाजहिताची कामे करण्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते इतर पदाधिकार्यांच्या निवडी करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी डॉ. अरूण राजपूरे, सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी संदिप माने, माहिती व प्रसारण जिल्हाध्यक्षपदी सचिन सापते, सातारा शहराध्यक्षपदी सुनील गायकवाड, सातारा शहर उपाध्यक्षपदी रवींद्र शेडगे, सातारा तालुका उपाध्यक्षपदी संदिप फडतरे व सातारा तालुका संघटकपदी सतीश शिंदे यांच्या निवडी करण्यात आल्या.
नवनियुक्त पदाधिकार्यांचे मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.