दैनिक स्थैर्य । दि. २७ ऑक्टोबर २०२२ । फलटण । संदीप चोरमले आणि सौ स्वातीताई संदीप चोरमले यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृतमहोत्सव वाढदिवसाचे निमित्ताने वार्ड क्रमांक नऊ मधील नागरिकांना दीपावली मध्ये एक छोटी भेट म्हणुन पाच किलो साखर 500 कुटुंबांना भेट स्वरूपात दिली.
आपली समाजाप्रती एक जबाबदारी म्हणून दिवाळी मध्ये साखर वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. संदीप चोरमले आणि स्वातीताई संदीप चोरमले नेहमीच नागरिकांच्या मदतीला धावून येतात व विविध सामजिक कार्यक्रम घेत समाजात एक आदर्श निर्माण करत असतात. यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे अमृतमहोत्सव वाढदिवसाचे निमित्ताने दीपावली चे औचीत्त्य साधून वार्ड क्रमांक नऊ मधील नागरिकांचे आशीर्वाद घेऊन छोटी भेट म्हणुन पाच किलो साखर 500 कुटुंबांना घरपोच भेट स्वरूपात दिली. या कार्यक्रमाचे आयोजन संदीप चोरमले आणि स्वातीताई संदिप चोरमले यांनी केले होते. या वेळी प्रमुख जेष्ठ कार्यकर्ते, समस्त चोरमले आणि मित्र परिवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.