दैनिक स्थैर्य । दि. १७ डिसेंबर २०२१ । फलटण । शहरातील गिरवी नाका येथे वाळू माफियाचा हैवा वाहन अडवुन कारवाई करत असताना धक्काबुकी करत जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी कैलास महादेव ननावरे, वय ४४, रा. मंगळवार पेठ, झिरपे गल्ली, फलटण याच्या विरोधात फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या बाबत फलटण शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी की, गुरूवार दि. १६ रोजी फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप हे आपले शासकीय कामासंदर्भातीस मिटींग संपवुन येत असताना गिरवी नाका येथे जाधववाडीच्या बाजुने अवैध रित्या वाळू वाहतुक करणारा हैवा ट्रक फलटणकडे जाताना दिसला. म्हणुन त्याच्यावर शासकीय कारवाई करत असताना कैलास महादेव ननावरे हा फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करित आहेत.