सातारा तालुक्यातील सहा शाळांच्या वर्ग खोल्या बांधण्यास मंजुरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.०२: आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नांतून सातारा तालुक्यातील सहा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या नवीन आठ वर्ग खोल्या बांधण्यासाठी निधी मंजूर झाला आहे.

सातारा पंचायत समितीच्या सभापती सौ. सरिता इंदलकर यांनी चोरगेवाडी, नागेवाडी, पिसाणी, कोंडवे, पेट्री आणि कळंबे या गावात शाळेसाठी नवीन वर्ग खोल्या बांधण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे केली होती. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने चोरगेवाडी येथे एक नवीन वर्ग खोली बांधण्यासाठी ८.९६ लाख रुपये, नागेवाडी येथे एक खोली बांधण्यासाठी ८.९६ लाख, पिसाणी येथे दोन खोल्या बांधण्यासाठी १७.९२ लाख, कोंडवे येथे दोन खोल्यांसाठी १७.९२ लाख, पेट्री येथे एक खोली बांधण्यासाठी ८.९६ लाख आणि कळंबे येथे १ वर्ग खोली बांधण्यासाठी ८.९६ लाख रुपये निधी मंजूर केला आहे.

प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करून तातडीने मंजूर खोल्या बांधाव्यात तसेच काम दर्जेदार करून निर्धारित वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!