एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळल्याने पाटण तालुक्यातील सणबूर हादरले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २१ जुलै २०२३ | सातारा |
सणबूर (ता. पाटण) येथे एका राहत्या घरात चौघांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेने ढेबेवाडी विभाग हादरला आहे. ही घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. मृतांमध्ये आई-वडिलांसह दोन मुलांचा समावेश आहे. यातील वडील हे सेवानिवृत्त शिक्षक होते.

सणबूर येथील आनंदा पांडुरंग जाधव (वय ७५), पत्नी सुनंदा आनंदा जाधव (वय ६५), मुलगा संतोष आनंदा जाधव (वय ४५) व एक विवाहीत मुलगी सौ. पुष्पलता प्रकाश धस (रा. मंद्रुळकोळे, ता. पाटण) हे चारजण झोपलेल्या अवस्थेत मयत आढळले.

सेवानिवृत्त शिक्षक आनंदा जाधव हे आजारी होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर कराडच्या कृष्णा हॉस्पिटल येथे उपचार करून घरी सोडण्यात आले होते. त्यांना घरी ऑक्सिजनची सुविधा देण्यात आली होती. त्यासाठी जनरेटरही लावण्यात आला होता. त्यांच्या देखभालीसाठी पत्नी, मुलगा व विवाहीत मुलगी त्यांच्याजवळ होती.

शुक्रवारी सकाळी हे चौघेजण मृतावस्थेत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर ढेबेवाडी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. ढेबेवाडी पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!