महात्मा शिक्षण संस्थेचे काम उल्लेखनीय : सम्यक शहा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 28 जुलै 2024 | फलटण | महात्मा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या मूकबधिर विद्यालयातील दिव्यांग मुलांना स्पीच रूमच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण पुरविले जात आहे. त्याच बरोबर प्रत्येक क्लास रूममध्ये प्रोजेक्टरच्या माध्यमातून व एज्युकेशनल व्हिडिओच्या माध्यमातून स्पेशली ट्रेनिंग दिले जात असून महात्मा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात असल्याचे प्रतिपादन चंदुकाका सराफ सुवर्णपेढीचे संचालक तथा युवा उद्योजक सम्यक किशोरकुमार शहा यांनी केले.

चंदुकाका सराफ यांच्या वतीने मूकबधिर विद्यालयातील मुलांना पिण्याच्या पाण्याचा कुलर देण्यात आला. तसेच प्रत्येक मुलांना स्कूल बॅग व स्कूल बॉटल देण्यात आली याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सम्यक शहा बोलत होते.

याप्रसंगी उद्योजक निकेत फडे, चंदुकाका सराफ मार्केटिंग विभाग व जाहिरात विभागाचे प्रमुख अमोल पात्रे, मार्केटिंग विभागाचे प्रमुख कुमार राठोड, बारामती विभाग प्रमुख धनंजय माने, क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद नेवसे, महात्मा शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष दादासाहेब चोरमले, महात्मा शिक्षण संस्थेचे सचिव सौ. वैशाली चोरमले, विडणीचे माजी सरपंच शरद कोल्हे, कृणाल खलाटे इत्यादी मान्यंवर याप्रसंगी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सम्यक शहापुढे म्हणाले की, विद्यालयाच्या परिसरामध्ये आल्यानंतर हा परिसर पाहून आम्हाला खूप आनंद वाटला या ठिकाणी केलेले वृक्षारोपणाचे काम मोठ्या प्रमाणावर दिसून आले तसेच भविष्यातही दिव्यांग मुलांसाठी मुलांसाठी महात्मा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण व नवनवीन उपक्रम राबविण्यात यावेत या कामी निश्चितपणे आपल्या संस्थेला मदतीचा नेहमीच हात पुढे राहील असेही शेवटी सम्यक शहा म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाच्या मुख्याध्यापिकास वैशाली शिंदे यांनी विद्यालयाच्या कामकाजाची माहिती उपस्थित मान्यवरांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमा गोडसे व विजया मठपती यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उदय निकम, निर्मला चोरमले व चेतन खरात यांचे विशेष सहकार्य लाभले.


Back to top button
Don`t copy text!