दैनिक स्थैर्य । दि. १७ ऑगस्ट २०२२ । पंढरपूर । स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी भारताच्या सन्माननीय पंतप्रधानांनी घोषित केलेल्या “हर घर झेंडा” अभियानात सहभागी होऊन सम्यक क्रांती मंच यांच्यावतीने पंढरपूर नगरपरिषद प्रस्तावित बुद्धभूमीवर ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अंबादास धोत्रे, रिपाइंचे पंढरपूर शहर अध्यक्ष ऍड. किर्तीपाल सर्वगोड, भाजपाचे अध्यक्ष उमेश सर्वगोड, रिपाइंचे अमित कसबे, यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकाविण्यात आला. उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना देताना राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. सम्यक क्रांती मंचचे संस्थापक सिद्धार्थ जाधव यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सेनांनीप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि भारताच्या एकात्मतेसाठी सर्वांनी कटीबद्ध राहण्याचे आवाहन केले. या महोत्सवात पंढरपूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सुनील सर्वगोड, पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक डी.राज सर्वगोड, आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. हा महोत्सव उत्साहात पार पाडण्यासाठी सम्यक क्रांती मंचचे अध्यक्ष प्रशांत लोंढे, सोलापूर जिल्हाध्यक्ष रवींद्र शेवडे, सचिव स्वप्नील गायकवाड, रवि सर्वगोड, कृष्णाजी लिहिणे, प्रकाश वाळके, अण्णा पोफळे, विकास कांबळे सर, राजू बंगाळे, बाळासाहेब देवकर, अरविंद कांबळे, प्रवीण माने, सुखदेव कांबळे तसेच रमामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा काजल भोरकडे, संगीता सर्वगोड, विजया सर्वगोड आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी मारुती सर्वगोड यांचेकडून उपस्थितांना मिठाई वाटण्यात येऊन या महोत्सवाची सांगता करण्यात आली.