स्थैर्य, मुंबई, दि. ०५ : एनसीबीने काल रात्री रियाचा भाऊ शोविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांना अटक केली. त्यांनतर त्यांना आज कोर्टासमोर हजर करण्यात आले. कोर्टाने त्या दोघांना नऊ सप्टेंबरपर्यंत एनसीबीची कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अजून एका कैझन इब्राहिम नावाच्या आरोपीला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. नुकतेच कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
शोविक आणि सॅम्युअलच्या अटकेमुळे सुशांतच्या मृत्यूनंतर दोन महिने चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांना अमली पदार्थाबाबतचे माहिती का मिळू शकली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शोविकनंतर एनसीबी रियाला ताब्यात घेण्याची शक्यता आहे. शोविक, मिरांडा यांनी सुशांतला नशेशी लत लावून अमली पदार्थ पुरवल्याचे पुरावे एनसीबीच्या हाती लागले आहेत. दरम्यान अंमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी शोविक आणि सॅम्युअल मिरांडाला कोर्टात आणण्याआधी सायन रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. या दोघांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.