दैनिक स्थैर्य | दि. ६ डिसेंबर २०२४ | फलटण |
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग कल्याण विभाग, जि. प. सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत महात्मा शिक्षण संस्था संचलित, मूकबधिर विद्यालय, गोळेगाव, फलटणची दिव्यांग विद्यार्थिनी कु. समृद्धी गणेश कांबळे हिचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल सातारा जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन तिला गौरविण्यात आले.
याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, सातारा जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजयकुमार चल्लमवार, सातारा जिल्हा समाज कल्याण वै. सा. का. शेळके मॅडम यांची उपस्थिती होती.
महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालय, फलटण हे सातारा जिल्ह्यातील नामांकित मूकबधिर मुलांची शाळा असून या विद्यालयामार्फत दिव्यांग मुलांना सर्व त्या अत्याधुनिक सोयी-सुविधा पुरविल्या जातात.
३ डिसेंबर ते १० डिसेंबरदरम्यान हा आठवडा हा संपूर्ण देशभर ‘अपंग सप्ताह’ म्हणून पाळण्यात येतो. यादरम्यान दिव्यांग क्षेत्रातील मुला-मुलींसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा सप्ताह पाळण्यात येतो. या सप्ताहानिमित्त दिव्यांग मुलांसाठी निबंध, हस्ताक्षर, चित्रकला याबरोबर विविध स्पर्धा घेतल्या जातात.