समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट व भौतिक प्रगती होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


दैनिक स्थैर्य । दि. २७ मे २०२३ । नवी दिल्लीसमृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण आज झाले आहे. हा महामार्ग प्रगती करणारा महामार्ग असून येथील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवी दिल्ली येथे व्यक्त केला.

श्री शिंदे यांचे महाराष्ट्र सदन येथे आज संध्यकाळी आगमन झाले. यावेळी त्यानी प्रसार माध्यमांशी  संवाद साधला. समृद्धी महामार्गाबाबत बोलताना ते म्हणाले  कीनागपूर ते शिर्डी या ५२० कि मी. लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्याचा लोकार्पण  सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी झाला. या महामार्गाच्या दुसऱ्या टप्याचा शिर्डीपासून नाशिककडे जाणारा इगतपुरीपर्यंत ८० किमी लांबीचा महामार्ग लोकांसाठी आज खुला केला आहे . याबद्दल  माहिती देताना त्यांनी  सांगितले कीसमृद्धी महामार्ग  हा केवळ महामार्ग नसून त्या भागाची भरभराटआर्थिक व  भौतिक प्रगती  करणारा महामार्ग आहे. यामुळे  शेतकऱ्यांचा  मोठा फायदा होणार आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे आजपासून दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर असून शनिवारी नीती आयोगाची बैठक तसेच रविवारी नवीन संसदेच्या उद्घाटन समारंभात सहभागी होणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!