होळ व तांबवे येथील मृत वृद्ध व्यक्तींचे घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी रवाना; तर जिल्ह्यातील 177 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह


 स्थैर्य, सातारा, दि. 29 :  फलटण तालुक्यातील होळ येथील 84 वर्षीय महिला व तांबवे येथील 94 वर्षीय पुरुष यांचा काल दि.28 मे रोजी मृत्यु झाला आहे. या दोघांचा कोविड संशयित म्हणून घशातील स्त्रावांचा नमुने तपासणीकरिता, पुणे येथे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

काल रात्र उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 23 जणांचे घशातील स्त्रावांचा नमुने एन.सी.सी.एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर 177 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचेही एन.सी.सी.एस. पुणे यांनी कळविले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!