
दैनिक स्थैर्य । 18 एप्रिल 2025। फलटण । फलटण शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक बदने हे साखरवाडी येथे गांजा पकडताना गंभीर जखमी झाले होते. विश्रांतीसाठी ते घरी असताना जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. जिल्हा पोलीस प्रमुखांच्याभेटीने बदने कुटुंबीय भारावून गेले होते. यादरम्यान बदने यांच्या आईला अश्रू अनावर झाले. यावेळी पोलीस उपअधिक्षक राहुल धस, पोलीस निरीक्षक सुनील महाडीक उपस्थित होते.
सोेमवार दि. 14 एप्रिल रोजी उपनिरीक्षक बदने साखरवाडी परिसरात गांजा वाहतूक करणारी गाडी हाताने पकडली होती. त्यादरम्यान वाहन धारकाने बेदकारपणे गाडी चालवून उपनिरीक्षक बदने यांना गाडीने फरफटत नेले. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. गंभीर दुखापत होवूनही त्यांनी गाडी सोडली नाही. त्यामुळे गांजा पकडून आरोपींना ताब्यात घेता आले.
याप्रसंगी कर्तव्यावर असताना जीवावर बेतले तरी सुद्धा कर्तव्य सोडले नाही. या कर्तव्यनिष्ठ पोलीस उपनिरीक्षक बडणे यांची घरी जाऊन जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यावेळी बदने यांचे आई, वडील, पत्नी व इतर नातेवाईक उपस्थित होते. पोलीस अधिक्षक समीर शेख त्यांच्या घरी स्वत: भेटायला आल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला.
वारिष्टांची कौतुकाची थाप ही पोलीस दलातील अधिकारी, कर्मचार्यांसाठी संजीवनीच असते. त्यांच्या भेटीमुळे ते काही काळ वेदना विसरून गेले.