संबित पात्रा जळत्या निखाऱ्यांवर चालले; स्वतः शेअर केला व्हिडिओ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १२ एप्रिल २०२३ । नवी दिल्ली । भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा  त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. पण यावेळी ते एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आले आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, ज्यात ते जळत्या निखाऱ्यांवर(कोळशावर) अनवाणी चालताना दिसत आहेत. संबित पात्रा यांनी स्वत: हा व्हिडिओ ट्विट करुन आपला अनुभव सांगितला.

संबित पात्रा मंगळवारी महा विसुवा संक्रांती म्हणजेच ओडिया नववर्षाच्या निमित्ताने पुरी जिल्ह्यातील झामू येथे जत्रेत सहभागी झाले होते. यावेळी ते गरम निखाऱ्यांवर अनवाणी चालले. हा व्हिडिओ ट्विट करत ते म्हणाले की, आज मी पुरी जिल्ह्यातील समंग पंचायतीच्या रेबती रमण गावात यात्रेत सहभागी झालो. यावेळी अग्नीवर चालत मातेची पूजा केली आणि आशीर्वादही घेतले. यावेळी आईकडे ग्रामस्थांच्या सुख समाधानासाठी पार्थना केली. आईचा आशीर्वाद मिळाल्याचा आनंद वाटतो.

काय आहे यात्रेचे महत्व?
महाविसुवा संक्रांती म्हणझेच ओडिया नववर्षाच्या निमित्ताने झामू येथे आयोजित होणारी जत्रा सर्वांचेच लक्ष वेधून घेते. या यात्रेत आपला नवस फेडण्यासाठी जळत्या निखाऱ्यांवरुन चालण्याची प्रथा आहे. जळत्या निखाऱ्यांवर चालणाऱ्या व्यक्तीला पटुआ किंवा पवित्र भक्त मानले जाते. हे पटुआ जळत्या निखाऱ्यांवर चालून आपला नवस पूर्ण करतात. या यात्रेचे राज्यात खूप महत्व असून, राज्यभरातून भाविक इथे येतात.


Back to top button
Don`t copy text!