दैनिक स्थैर्य | दि. 06 मार्च 2024 | फलटण | छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासनिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, फलटण विभाग यांच्यामार्फत आज बुधवार, दि. ६ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता शिवतपस्वी आदरणीय गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजींचे जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे. हे व्याख्यान महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे होणार असून या व्याख्यानास मोठ्या संख्येने फलटणकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, फलटण विभाग यांच्याकडून करण्यात आले आहे.