
दैनिक स्थैर्य । दि.३० डिसेंबर २०२१ । फलटण । राज्यामधील विविध क्षेत्रामध्ये काम करत असणार्या मान्यवरांना विविध पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यामध्ये फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते हरिश हणमंत काकडे (अप्पा) यांना या दुसर्या महाअधिवेशन सोहळ्यामध्ये “चक्रवर्ती सम्राट अशोक समाज भुषण पुरस्काराने” सन्मानित करण्यात येणार आहे.
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या केंद्रिय सामाजिक संस्थेचे दुसरे राज्यस्थरीय महाअधिवेशन नुकतेच संपन्न झाले. महात्मा फुले, छत्रपती शाहु महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. त्यावेळी सदरील पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
फलटणमध्ये कार्यरत असणार्या विविध सामाजिक कार्यकर्त्यांची दखल नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या केंद्रिय सामाजिक संस्थेने फलटण येथील पुढील सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहेत.
हरिश हणमंत काकडे – चक्रवर्ती सम्राट अशोक समाजभुषण पुरस्कार.
महादेव यादव अहिवळे – तथागत गौतम बुद्ध धम्मभूषण पुरस्कार
बंडू अहिवळे – राष्ट्रसंत कबीर समाज गौरव पुरस्कार
शिवभोला काकडे – राष्ट्रसंत कबीर समाज गौरव पुरस्कार