छत्रपती शिवाजी महाराज यांना विधान भवनात अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि. २० फेब्रुवारी २०२३ । मुंबई । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्यास महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. सकाळपासूनच विधान भवनाचा परिसर तुतारी-सनई चौघड्याच्या निनादाने दुमदुमून गेला होता. पारंपरिक वेषातील तुतारीवादक हे या शिवजयंती सोहळयाचे वैशिष्टय ठरले.

याप्रसंगी विधानसभा अध्यक्षांचे सचिव महेंद्र काज, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.


Back to top button
Don`t copy text!