स्थैर्य, सातारा, दि. 29 : सलून व्यवसायिकांनी स्वत:च्या कुटुंबाचे तसेच समाजाच्या हितासाठी व्यवसाय सुरू करताना प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन सपोनि. डॉ. सागर वाघ यांनी बोरगाव येथे बैठकीत केले.
सध्या जिल्ह्यातील सलून व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. यावर बोरगाव हद्दीतील गावांमध्ये सलून व्यवसाय करत असलेल्या व्यवसायिकांना खबरदारीच्या उपायांसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी बोलताना वाघ म्हणाले, संपूर्ण देशात कोरोना संकटाच्या विरुद्ध लढाई सुरू आहे. प्रशासन दिवसरात्र लढत आहे. प्रत्येक व्यक्तीने काळजी घेणे गरजेचे आहे. सलून दुकानात सॅनिटायझर, मास्क, निर्जंतुकीकरण केलेले साहित्य, स्वच्छ टॉवेल, केस कापण्यासाठी वापरले जाणारे साहित्य स्वच्छ असणे गरजेचे आहे. तसेच सोशल डिस्टनसिंग आदी घबरदारी घेणे गरजेचे आहे. यावेळी नाभिक समाजाच्यावतीने स्वाभिमानी नाभिक संघटनेचे तालुकाध्यक्ष जगन्नाथ पवार यांनी सपोनि. सागर वाघ यांचे स्वागत केले. यावेळी सहाय्यक फौजदार चंद्रकांत कुंभार, हवालदार मनोहर सुर्वे, पोलीस कर्मचारी विजय साळुंखे उपस्थित होते.